बुधवार, ५ जून, २०१९

एकटा मी

मावळत्या रवीला मुक्कामाचा आग्रह नाही,
गजबजलेल्या दुनियेत मी काही एकटा नाही
माझ्या उरी प्रेमापोटी तो माझ्या सोबत राही
आणि सोबत त्याच्याच सारखे ग्रह काही

ही रात्र भयान नित्य वाटे मज बावरी
स्मशान घनघोर अंधारात तुझ्याच
रात्रीच्या चांदण्यांचे तेज मज सावरी

असू दे पाठी चांदण्यांचा सहवास रे
माझा एकट्याचा दूरचा हा प्रवास रे
मला माझ्या घरची वाट तु दाव रे
चंद्रा दाखव माझा आनंदलेला गाव रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा