बुधवार, ५ जून, २०१९

आई

तिचं जरा ऐकावं आणि
तिचंही एक काव्य रेखाटावं
बाप समजून घेतांना तिचं
दुःख अक्षरांतून मांडावं

विचारांच्या कोलाहलातून
एक विचारपुष्प तिला वाहवं
वाहतांना पुष्प विचाराचं
माझंच एक पुष्प व्हावं

जन्म तिच्या उदरातून घेतांना
तिला रोज हृदयात जपावं
झालाच सामना बापाशी तर
हळूच तिच्या पाठी लपावं

दाटलाच काळोख कधी तर
तिच्या समीप बसावं
ती तर आहेच समई
कधी आपणच आई व्हावं

बाप कवितेतून रेखाटतांना
तिचंच स्मरण करावं
जमलंच कधी तर
प्रत्येकजन्मी तिच्याच पोटी
जन्माला यावं

✍ श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा