नात्याच्या स्वर्गीय रेशीम गाठींना
आपण मनोमन घट्ट करत असतो
जेव्हा राणी तू असतेच ना संगती माझ्या
तेव्हा लाखो चांदण्या सोबत असूनही
आकाशीचा तो चंद्रही हिरमुसतो
लपतो ढगाआड अन ग्रहनांचा
शाप तो उपभोगतो......
ग्रह, तारे,गुण, नक्षत्रही जुळून आले
तु झालीस राणी अन मी राजा झालो
श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा