बुधवार, ५ जून, २०१९

शेतकरी आणि शिक्षक

देशाचं नाव उज्ज्वल व्हावं म्हणून
झिजवत राहतो खडू फळ्यावर
दाखवतो मार्ग ज्ञानाचा देशप्रेमाचा
आईगत माया करतो अन सुकर
करतो पाथ यशाचा,उज्वलतेचा
त्याच्या लगतच्या दोन बाहुंची
बेरीज असते बरोबर त्याच्या
कर्तृत्वाच्या बेरजेइतकी अन
ज्याच्या शिकवणुकीने साऱ्या
जगताच्या अज्ञानाला निःशेष
भाग जातो तो गुरू  असतो...
असाच एक गुरू  दिसतो  मला
माझ्या शेतकरी बापाच्या आत
जसा काळ्या फळ्यावर माझा
गुरू  गिरवत  असतो  अक्षरं सोनेरी
तसाच काळ्या मायभूमीतून तो
पिकवतो जगताच पोट भरणारी
दाणे हिरवी....

अखिल विश्वातील अज्ञानाचा अंधकार
दूर करणार्या शिक्षकास आणि मानव जातीचे उदरभरण करणार्या बळीराज्यास मानाचा मुजरा...

✍ श्रीकांत पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा